तो जे बोलतो
ते ती ऐकत नाही
ती ते ऐकते
जे तो बोलतच नाही
ती जे बोलते
ते ऐकावच लागतं त्याला
ती जे बोलत नाही
ते समजून घ्यावं लागतं त्याला
ती बोलू लागली
कि थांबतच नाही
तो वाट पाहतो
पण चान्सेच नाही
बोलून बोलूनही ती म्हणते
मी कुठ काय बोलते
वर म्हणते त्याला
तुम्ही बोलत का नाही
तो अबोलच राहतो
फक्त मंद स्मित करतो
आणि अबोल संवाद साधतो |